‘भाजपविरोधी काम करणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा..’; पराभवानंतर भाजप नेत्याचा आक्रमक सूर


सोलापूर : भाजपचे राम सातपुते यांचा माळशिरस मतदारसंघातून निसटता पराभव झाला आहे. राज्याच्या राजकारणातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या मोहिते पाटील घराण्याशी दोन हात करत सातपुते यांनी निकराची झुंज दिली. तरी सुद्धा त्यांच्या पदरी अपयश आले. त्यानंतर राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपतून हकालपट्टी करावी, अशी मागणी आमदार सातपुते यांनी केली आहे.

राम सातपुते यांनी सोशल मीडियातून आमदार मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याचे समोर येत आहे. आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये राम सातपुते यांनी म्हटले आहे की, माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. भाजपचा कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.

तसेच राम सातपुते पुढे म्हणाले की, भाजपने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली. साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली, त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केले. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटण्यात आले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. रणजितसिंह मोहिते पाटील यांची तत्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!