वैष्णवीच्या मृत्यूबाबत वेगळाच संशय, साडी अन् पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का? आता लॅबमध्ये होणार तपासणी…


पुणे : पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने आपले जीवन संपवल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेला आहे. हुंड्यासाठी छळ होऊन ही घटना घडली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान वैष्णवीने ज्या फॅनला गळफास लावून घेतला आणि ज्या साडीचा वापर केला. बावधन पोलीस ते फॅन आणि साडी फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवणार आहेत. वैष्णवीचे कुटुंबीय ही हत्या आहे, असा संशय वारंवार व्यक्त करत आहेत. त्या अनुषंगाने हा फॉरेन्सिक रिपोर्ट महत्वाचा ठरणार आहे.

वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात बावधन पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. वैष्णवीने साडीच्या साह्याने घरातील पंख्याला गळफास घेतला होता. त्यामुळे साडी आणि पंखा आज (मंगळवारी) न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक लॅब) पाठवण्यात येणार आहे. हा पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का, याची तपासणी देखील होणार असल्याची माहिती आहे.

वैष्णवी हगवणे हिने भुकूम येथील आपल्या घरी सासरच्या त्रासाला कंटाळून १६ मे रोजी घरात गळफास घेतला होता. त्यानंतर १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, दीर सुशील, नणंद करिष्मा आणि सहआरोपी नीलेश चव्हाण याला अटक केली आहे. या सर्वांची चौकशी सुरू आहे.

वैष्णवीला होत असलेला सासरकडचा त्रास, मारहाण यामुळे वैष्णवीनं आपलं जीवन संपवलं, मात्र ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे, असा संशय वैष्णवीच्या माहेरच्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता सर्वच दृष्टीकोनातून पोलिसांचा तपास सुरू असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान वैष्णवीने साडीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. तिचे वजन ७१ किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदवले आहे. हा घरातील पंखा वैष्णवीचं ७१ किलो वजन पेलू शकतो का हे तपासण्यासाठी साडी, पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहे. या शिवाय नीलेश चव्हाणच्या ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप आणि मोबाइलही तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!