राज्यात आणखी ५०० कोटींचा घोटाळा; अंजली दमानिया यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाल्या?

पुणे : गोवंडी येथे बीएमसीने सार्वजनिक निधीतून तब्बल ५०० कोटी रुपये खर्चून उभारलेले ५८० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय आता खासगीकरणाच्या गर्तेत ढकलले जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

या प्रकरणात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवले आहे. अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, “हा पूर्णपणे जनतेचा पैसा आणि जनतेची जमीन आहे. तरीही ५८० पैकी फक्त २६४ खाटा गरीब आणि केसरी/पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत, उरलेल्या खाटांवर खासगी रुग्णांवर उपचार करून रुग्णालयाचा व्यवसाय केला जाणार आहे.

ही जनतेच्या मालकीची संपत्ती राजकीय नेते आणि खासगी रुग्णालयांच्या घशात घालण्याची खेळी आहे. या प्रकरणात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवले आहे.

अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, “हा पूर्णपणे जनतेचा पैसा आणि जनतेची जमीन आहे. तरीही ५८० पैकी फक्त २६४ खाटा गरीब आणि केसरी/पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत, उरलेल्या खाटांवर खासगी रुग्णांवर उपचार करून रुग्णालयाचा व्यवसाय केला जाणार आहे. ही जनतेच्या मालकीची संपत्ती राजकीय नेते आणि खासगी रुग्णालयांच्या घशात घालण्याची खेळी आहे.
