उरुळी कांचन येथे स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन; स्मार्ट मीटरने ग्राहकांच्या लूटीचा आरोप….


उरुळी कांचन: उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.उपकार्यकारी अभियंता महेश धावडे यांच्या कार्यालयातील केबीन मध्ये ठिय्या आंदोलन करून स्मार्ट मीटर सक्तीचा निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर, उरुळी कांचन शहर प्रमुख सचिन कांचन, उप तालुका प्रमुख अनिल कदम, युवासेना तालुका प्रमुख प्रकाश तुपे, अवधूत राऊत,सचिन दसुर,मयूर ननावरे,पुष्कर वनारसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ठिय्या आंदोलनानंतर उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे यांना लेखी निवेदन देऊन,हवेली तालुक्यातील गावांमध्ये वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर शक्ती करू नये अशी मागणी करण्यात आली.

“विद्युत कायदा २००३ व सुधारणा नियम २०२६ नुसार देशातील सर्व वीज वितरण कंपन्यांना आपल्या सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणे ठराविक काळात बंधनकारक आहे. त्यानुसार आपल्या परिसरातील ग्राहकांचे वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे .स्मार्ट मीटर बसवण्याची मुख्य उद्दिष्टे १)अचूक रीडिंग.२) वीज चोरी थांबवणे ३)ग्राहकांना दर्जेदार व पारदर्शक सेवा पुरवणे आणि वीजपुरवठा गुणवत्ता सुधारणे ही आहेत.

-महेश धाडवे उपकार्यकारी अभियंता उरुळी कांचन महावितरण उपविभाग.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!