बारामतीत प्रेमसंबंधाच्या तणावातून तरुणाने जीवन संपवलं; उपचारादरम्यान मृत्यू…


बारामती : बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात १९ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी (दि. १३) सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मयत तरुणाचे नाव अविष्कार अमोल ढोले (वय १९, रा. कुरवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आहे. तो सध्या बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविष्कार याचे त्याच्या गावातील एका महिलेसोबत संबंध होते. या संबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर अविष्कार तणावात असल्याचे सांगण्यात आले आहे.

याच तणावातून १२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास सूर्यनगरी येथील राहत्या खोलीत त्याने स्वतःकडील पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली.

या घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला उपचारासाठी प्रथम बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, १३ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी मयत रजिस्टर क्रमांक ८५/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद केली आहे. या घटनेची नोंद पोलीस हवालदार शेख यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!