अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडणार, किती झाला दर? जाणून घ्या..

पुणे : सध्या दुधाच्या दरात प्रतिलीटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय अमूल कंपनीने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढल्याची माहिती समोर आली होती. गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे घराघरातील गृहिणींचे आर्थिक बजेटवर परिणाम पडलेला बघायला मिळाला. असे असताना आता दुधाचे दर वाढले आहेत.
यामुळे गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यासह देशात महागाईचा भडका उडताना दिसत आहे. अनेक वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कात वाढ केल्याने जगभरात त्याचे पडसाद उमटताना दिसले आहेत. यामुळे मोठ्या आर्थिक घडामोडी घडत आहेत.
देशासह जगभरातील विविध शेअर बाजारात त्याचा फटका बसलेला बघायला मिळाला आहे. एकीकडे जागतिक पातळीवर महागाई आणि मंदीचं सावट येणार असल्याची चर्चा असताना आता देशात सुद्धा महागाई टोक गाठताना दिसत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले.
अमूल दुधाच्या किंमतीत देशभरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमूलकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात अमूलचे जे सध्याचे दर आहेत, त्यापेक्षा दोन रुपयांनी प्रतिलीटर दूध महागले आहे. याबाबत ग्राहकांना अधिकचे पैसे दर मिळणार आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे जिल्ह्यात अमूल ताजा दुधाचा चांगला खप आहे. सध्या अमूल ताजाच्या अर्धा लीटरच्या पिशवीवर 28 रुपये अशी छापील किंमत असते. सहा महिन्यांनी दुधाचे दर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागतालाना दिसत आहे. प्रतिलीटर दोन रुपये जरी वाढवले आणि एका कुटुंबाला दर दिवशी एक लीटर दूध जरी लागत.