Ajit Pawar : अजित पवार विधासभेला बारामतीतून पराभूत होतील, लाडक्या बहिणीच त्याचा पराभव करतील; बड्या नेत्याने केला मोठा दावा…

Ajit Pawar : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.या योजनेची घोषणा झाल्यापासून विरोधकांनी सातत्याने महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून विधानसभेत मत विकत घेण्यासाठी आहे. अशी जोरदार टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
अजित पवार बारामती मधून पराभूत होतील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. Ajit Pawar
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चांगल्या हेतूने आणली नसून ही योजना फक्त विधानसभा निवडणुकीमध्ये मते विकत घेण्यासाठी आणण्यात आली आहे. मात्र लाडक्या बहिणी या लाचार नसून त्या आगामी विधानसभेत तुमचा पराभव करतील असं पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, गेल्या ३ वर्षांपासून महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. १४ महापालिकेवर सध्या प्रशासक असून सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी लगावला.
लोकसभेच्या सर्वे अनुकूल नव्हता महाराष्ट्राचा सर्वे देखील अनुकूल नाही. पण तरीही राज्यात पुन्हा ठाकरे २ सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असंही राऊतांनी ठामपणे सांगितले आहे.