Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, तुला पाडणार, अमोल कोल्हे म्हणाले संध्याकाळी कन्फर्म….; शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलं


Ajit Pawar : शिरूर लोकसभा मतदार संघात यावेळी अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे याठिकाणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पराभव दिसतोय म्हणून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशी विधाने सुरु आहेत, असा टोला शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.

यामुळे आता अजित पवार आणि अमोल कोल्हे असा राजकीय वाद सुरू झाला आहे. नुकतेच प्रचारावेळी अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना मागच्यावेळी मी निवडून आणले होते. पण यावेळी मी त्यांना पाडणार असे विधान केले होते. याची राज्यात चर्चा रंगली होती.

आता यावर बोलताना संध्याकाळी कन्फर्म लीड सागंतो’ असे प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी दिले. आज त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. Ajit Pawar

यामुळे हा लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याठिकाणी पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, यावर बोलताना कोल्हे म्हणाले, अशा घटना कार्यकर्त्यांकडून समोर येत आहेत. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सजग करण्याचा प्रयत्न करतोय.

अशा पद्धतीने मतदाराचं मत विकत घेण्याची कोणाची मानसिकता असेल, तर मग नंतर मायबाप मतदाराच्या प्रश्नासाठी किती जागरु राहणार, हा जनतेनेही विचार करण्याची गरज आहे. शिरुरची जनता मत विकत घेणाऱ्याला थारा देणार नाही, असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!