Ajit Pawar : भर सभेत अजित पवारांना मराठा आंदोलकांचा विरोध, थेट मंचावर आरडाओरड, गोंधळ; १४ आंदोलकांवर गुन्हे दाखल….


Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हिंगोलीतील वसमतच्या सभेत गोंधळ घातलेल्या १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर सभेवेळी गोंधळ झाला होता.

उपमुख्यमंत्री स्टेजवर जाताच काही मराठा आरक्षण आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत घाषणाबाजी करत गोंधळ घातला होता. असाच प्रकार हिंगोलीच्या वसमतच्या सभेवेळीही घडला. यात गोंधळ घातलेल्या १४ मराठा आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Ajit Pawar

हिंगोलीतल्या वसमतमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी केली. अजित पवारांचे भाषण सुरू होताच मराठा आंदोलक आक्रमक झाले. वसमतमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात जन सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती.

या निमित्ताने वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय परिसरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भाषणाला आजित पवार उभे टाकताच मराठा आंदोलकांनी सभेत गोंधळ घातला आहे एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी स्टेज परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!