कलिंगडानंतर आता काकडीचाही धक्कादायक प्रकार! रेल्वे स्थानकावरची काकडी खात असाल तर ‘हा’ VIDEO एकदा पाहाच!


नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रवासी हलकं आणि ताजं काही खावं म्हणून रेल्वेस्थानकावरून काकडी, पेरू, केळी यांसारखी फळं खरेदी करतात. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडीओमुळे प्रवाशांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये रेल्वे स्थानकावर विक्रीसाठी ठेवलेल्या काकड्या हिरव्यागार आणि ताज्या दिसाव्यात यासाठी त्यांना रासायनिक रंगाच्या द्रव्यात बुडवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ बिहारमधील कटिहार रेल्वे स्टेशनवरील असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओमध्ये एक महिला विक्रेती जुन्या आणि शिळ्या काकड्यांना हिरवा रंग लावून पुन्हा विक्रीसाठी तयार करताना दिसत आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार खुलेआम सुरू असल्याने रेल्वे स्थानकांवरील अन्न सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी तेलकट पदार्थ टाळून फळे किंवा काकडी खाण्याला प्राधान्य देतात. मात्र आता या व्हिडीओमुळे ताज्या दिसणाऱ्या फळांबाबतही सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या रासायनिक रंगांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. यामुळे फूड पॉयझनिंग, उलट्या, जुलाब यांसारखे त्रास होण्याची

शक्यता असते. तसेच लिव्हर आणि किडनीवरही दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!