पॅन-आधार लिंकिंगसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ! परंतु यासाठी दंड आकाराला जाणार…!

नवी दिल्ली : महत्वाची माहिती समोर आली आहे. आता आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पॅन-आधार लिंकिंगसाठी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली गेली आहे. आता नागरिक 30 जूनपर्यंत त्यांचे आधार-पॅन कार्ड लिंक करू शकतात. परंतु यासाठी दंड आकाराला जाईल.
आयकर विभागाच्या नियमांनुसार आता लिंकिंगसाठी 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. पॅन-आधार लिंक करण्यापूर्वी तुम्हाला 1,000 रुपये भरावे लागतील, त्यानंतर तुम्ही लिंकिंग विनंती सबमिट करू शकाल.
याआधी आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती. जर तुम्ही अद्याप पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल, तर ते ऑनलाइन माध्यमातून सहज करता येईल.
Views:
[jp_post_view]