Accident News : खंडाळा घाटात भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू, सहा जण जखमी…


Accident News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिलजवळ भीषण अपघात झाला आहे.

एक कंटेनर आणि कारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात कारमध्ये बसलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यावरुन मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर एका अवघड वळणावर पलटल्याने हा अपघात झाला आहे.

लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर हा समोरून येणाऱ्या कारवर पलटला. Accident News

सदर कार ही अलिबाग वरुन तळेगाव दभाडेच्या दिशेने निघाली होती. या कारमध्ये तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते. या अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर योगेश चौधरी, जान्हवी चौधरी, दिपांशा चौधरी, जिगिशा चौधरी, मितांश चौधरी, आणि भूमिका चौधरी, हे सहा जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!