Accident News : कर्वेरोडवर भीषण अपघात, क्रेनने सायकल चालकाला चिरडले, सायकलस्वाराचा जागीच मृत्यू…


Accident News : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील हिट अँड रन प्रकरणाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच पुन्हा एकदा पुण्यात अपघाताची घटना समोर आली आहे. कर्वे रोडवर हा भीषण अपघात घडला आहे.

या घटनेत क्रेनने सायकल चालकाला चिरडले आहे. ही घटना घडल्यानंतर क्रेन चालक पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्यच्या सुमारास घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

सविस्तर माहिती अशी की, कर्वेरोड परिसरात भीषण अपघात झाला आहे. सकाळी सायकलस्वाराला क्रेनने चिरडले. यात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. कर्वे रोडवरील सोनल हॉल समोर एका सायकल स्वाराचा मृत्यू झाला. सायकलस्वार डेक्कनच्या दिशेने जात असताना क्रेनने चिरडले. Accident News

प्रत्यदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. कर्वे रस्त्यावर सध्या पदपथ व सायकल मार्गाचे काम सुरु आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता अरुंद झाला असून वाहनांची संख्य सकाळी व संध्याकाळी जास्त असते.

उड्डाणपुलावरुन वेगाने गाड्या येत असतात अशा वेळी सायकल स्वारांना रस्त्याने सायकल चालवणे दिवसेंदिवस अवघड बनत आहे. डेक्कन पोलीस अधिक तपास करत असून क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या सायकल स्वाराचे नाव अद्याप समजू शकले नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!