शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षावर गंभीर गुन्हा दाखल!! विवस्त्र करून गुप्तागांसह शरीरावर रॉडने चटके दिले अन्…


भोकरदन : एका शेतकऱ्याच्या गुप्तांगासह शरीरावर विविध ठिकाणी चटके देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. भोकरदन तालुक्यातील कार्ला ते जानेफळ गायकवाड चौफुलीवर जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी जि.प. सदस्य तथा शिवसेना (ठाकरे) गटाच्या तालुकाध्यक्षाच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला आहे.

दरम्यान ,यासंदर्भात पारध पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करेण्यात आला आहे. गंभीर जखमी शेतकऱ्यावर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतीच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शेतकरी कैलास गोविंदा बोराडे (३६ रा.आन्वा, ता. भोकरदन) हे परिसरातील वटकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते.

तेव्हा आरोपी सोनू ऊर्फ भागवत सुदाम दौड (रा. जानेफळ गायकवाड) याने माजी जि.प. सदस्य तथा शिवसेना (ठाकरे) गटाचे भोकरदन तालुकाध्यक्ष नवनाथ दौड (रा. जानेफळ गायकवाड) यांच्या सांगण्यावरून तसेच शेतीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून कैलास बोराडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. पेटत्या चुलीमध्ये लोखंडी रॉड टाकला.

तो रॉड लालबुंद झाल्यानंतर त्याला चुलीबाहेर काढून कैलास बोराडे यांच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर, गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावर तसेच गुप्तांगावर अमानुषपणे चटके देऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमा केल्या. शिवीगाळ करून हातानेही मारहाण केली. यावेळी बोराडे जिवाच्या आकांताने वाचवा म्हणून ओरडत असताना काही स्थानिकांनी मध्यस्थी करत बोराडे यांची सुटका केली.

दरम्यान, यासंदर्भात कैलास बोराडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ सुदाम दौड आणि सोनू ऊर्फ भागवत सुदाम दौड यांच्याविरोधात गुरुवारी रात्री उशिरा पारध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पारध ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने अधिक तपास करत आहेत. संशयित आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी नेमाने यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!