ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार, धक्कादायक घटनेने पुणे हादरले..

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्यूटी संपवून घरी जात असताना दोघांनी पोलिसांवर कोयत्याने वार केला. पुण्यातील लॉ कॉलेजरोडवर काल (ता.५) रात्री १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ड्यूटी संपवून घरी जात असताना रविवारी रात्री १ च्या सुमारास लॉ कॉलेजरोडवर बाईक वरुन जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनीट-3 मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडला आहे.

दरम्यान, या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Views:
[jp_post_view]
