कोरोना व्हायरस नंतर या संसर्गजन्य आजाराची जगाला ठरणार भिती ; आफ्रिका खंडात नव्या संसर्गजन्य आजाराने घातलयं थैमान ….!!

Viruse : 2019 साली जगाची गती एकदम थांबवून कोरोना आजार जगाला देऊन मानव जातीचा संहार केल्याचा ठपका असलेल्या चीनच्या महाभयंकर कोरोना रोगानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एका संसर्गजन्य रोगाने थैमान आफ्रिका खंडात थैमान घातले आहे.
आफ्रिका खंडातील कांगो देशांमध्ये या रहस्यमय आजाराने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजाराची माहिती घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक पथक कांगोमध्ये पाठवले आहे. कांगो देशाच्या पान्जी या भागात या आजाराचे प्रमाण मोठे आहे. हा आजार नेमका कशामुळे पसरतो आहे याची माहिती घेण्यासाठी हे पथक तेथे कार्यरत राहणार आहे.
दरम्यान या आजारामुळे 394 रुग्ण आजारी पडले, त्यातील 30 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी नोव्हेंबर महिन्यामध्ये 143 जण मृत्युमुखी पावल्याची माहिती स्थानिक स्तरावरून कांगो देशाच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे.
आफ्रिका खंडात संसर्गजन्य आजारात प्राथमिक माहितीनुसार डोकेदुखी, दम लागणे, ताप, खोकला आणि कुपोषण ही आजाराची लक्षणे आहेत असे सांगितले जात आहे.