पुण्यातील तरुणीला लग्नाच्या बोलणीनंतर झालेली मैत्री महागात पडली, तरुणाने केलं भलतंच….


पुणे : विद्येच माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसापासून प्रेम संबंधातून फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस येत असताना लग्नाच्या बोलणीवेळी झालेली मैत्री एका तरुणीला महागात पडली आहे. मैत्री झाल्यानंतर फिरायला गेलेल्या दोघा तरूण आणि तरूणीने शरीरसंबंध ठेवले. पण त्यानंतर लग्नाची बोलणी फिस्कटली आणि तरूणीचा दुसऱ्या ठिकाणी विवाह ठरला. हे समजताच तरूणाने तिला शरीर संबंध प्रस्थापित केल्याचे व्हिडीओ ठरलेल्या मुलाल दाखवले. या सर्व प्रकारानंतर त्या तरुणीचं लग्न मोडले.

याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी तरुणाने लग्नाची बोलणी करण्यासाठी फिर्यादी तरुणीला एका ठिकाणी बोलावून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. त्यानंतर त्याने तिच्या संमतीशिवाय व्हिडिओ चित्रण केले व तिला ब्लॅकमेल करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसरीकडे लग्न जुळलेल्या मुलाला तो व्हिडिओ दाखवला. हे समजतात त्या तरुणांन लग्न मोडले.दुसऱ्या ठिकाणी ठरलेलं लग्न मोडल्यानंतर पीडित तरूणीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी विरुद्ध विनयभंग, छेडछाड, खोटे आरोप लावून बदनामी करणे, आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपी तरुणीने दुसऱ्या ठिकाणी ठरलेल लग्न मोडून तिची बदनामी केली. त्याने केलेल्या सर्व प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!