दौंडसाठी चार तास मॅरेथॉन बैठक ! शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवारीवर दोघा नेत्यांचे एकमत करण्याचे प्रयत्न फोल ….

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दौंड विधानसभेच्या जागेचा गुंता अद्याप सुटत नसल्याची परिस्थिती आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार आणि माजी आमदार रमेश थोरात यांची कालची मुंबई वारीही निष्फळ ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, शिरुर, जुन्नर, खडकवासला या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. मात्र दौंड विधानसभा मतदारसंघा बाबत अद्याप उमेदवार जाहीर केला गेला नाही. काल दुसऱ्या यादीत तरी दौंड विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, दौंडकरांची विशेषतः माजी आमदार रमेश थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. सुमारे चार तास बैठक होऊन
उमेदवारी कोणाला द्यायची म्हणून निष्कर्ष न निघाल्याने दोन्ही उमेदवार रिकाम्या हाताने परतले आहे.