डॉक्टरने तपासण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला गच्चीत नेलं अन् केलं भयंकर कृत्य, घटनेने राज्य हादरलं…

अहमदनगर : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
संगमनेर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन युवतीवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अमोल करपे असे डॉक्टरचे नाव आहे. ही घटना समोर आल्यानंतर फरार डॉक्टरला काल रात्री ( ता.६) संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतलं आहे.
कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीला त्रास होऊ लागल्याने तिला खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले. पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी मुलीच्या प्रकृतीची चौकशी करून तिला टेरेसवर नेले व अत्याचार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे.
या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान कुटुंबीयांना माहिती समजतात कुटुंबीयांनी इस्पितळात धाव घेतली. यावेळी पोलिसांनीही घटनास्थळी जात परिस्थिती हाताळत डॉक्टर अमोल कर्पे याच्यावर गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार असल्याने पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून नाशिक येथून रात्री डॉक्टरला ताब्यात घेतल आहे.