सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार यांचा पहिला विजय; ‘ब’ वर्ग प्रतिनिधी गटातून संग्राम सोरटे विजयी..


बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा पहिला विजय हाती लागला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे उमेदवार संग्राम सोरटे ‘ब’ वर्गातून दणदणीत विजयी झाले आहेत.

त्यामुळे विजयाचा श्रीणेशा झाला असून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरोधकांना धोबीपछाड करणार का म्हणून मतमोजणीकडे लक्ष लागून राहिले आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे उमेदवार संग्राम सोरटे यांनी ‘ब’ वर्गातून विजय मिळवला आहे.

यापूर्वी ते बिनविरोध निवडून आले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून संग्राम सोरटे यांची बारामती तालुक्यात ओळख आहे. पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत संधी दिली होती. आता विजय मिळवत त्यांनी कारखान्यात पुन्हा प्रवेश केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!