लोणीकाळभोरला बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनीवर धमकी देऊन बलात्कार ; पिडीत मुलीच्या आईने पोलिसांत दिली तक्रार..


लोणी काळभोर : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी फोनवर वारंवार बोलत असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीतेच्या ३९ वर्षीय आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी हि लोणी काळभोर परिसरातील एका शैक्षणिक संकुलात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षणादरम्यान दोघांची ओळख झाली असून इयत्ता सहावी ते आठवीदरम्यान दोघे एकाच शाळेत शिकत होते. त्यानंतर संपर्क तुटला होता.

मे २०२५ मध्ये बारावीच्या उन्हाळी क्लासदरम्यान मुलाने पिडीतेच्या मोबाईलवर संपर्क साधला. “तुझे काही फोटो माझ्याकडे आहेत,” असे सांगून त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. सुरुवातीला मुलीने दुर्लक्ष केले परंतु फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने ती घाबरली व त्याला भेटली. त्याने तिला शेवाळवाडी, हडपसर येथील एका लॉजवर नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तसेच फोटो व्हायरल करण्याची भीती घालून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर अनेक वेळा याची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप आहे.

याकाळात तो तिला सतत फोन व मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. “घडलेला प्रकार घरी सांगीन,” अशी धमकी देत तो तिच्याशी संपर्क ठेवत होता. अखेर मुलगी फोनवर बोलताना आईला संशय आल्याने तिने विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी संपूर्ण प्रकार समोर आला.

याप्रकरणी पिडीतेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!