तटकरे उभे राहताच पार्थ पवार निघाले, पटेल गैरहजर, तटकरे- भुजबळ वाद, राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा राडा….

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पार पडलेली बैठक चांगलीच वादळी ठरली. बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी बैठकीला गैरहजर राहिल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या. दोघांनी आमच्या बाजूनं उभं राहत नसल्याची खंत बोलून दाखवली. यामुळे बैठकीत भयाण शांतता पसरली.
टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का? असा सवालही सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. यामुळे राष्ट्रवादीत सगळं काही अलबेल असल्याचे दिसून आले आहे. यावर सुनेत्रा पवार या नेमकं काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील तटकरे मुद्दे मांडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

स्पष्टता येण्यासाठी आपण बोलणारच असल्याचं सुनील तटकरेंनी छगन भुजबळांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुनील तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चा सुरू झाल्या.

प्रफुल पटेल यांच्या गैरहजेरीनंतर नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच, छगन भुजबळांनी मात्र सुनील तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे