जमिनीच्या वादातून वळतीत शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल


उरुळी कांचन : जमिनीवरील वादातून शेतकऱ्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वळती गावात घडली असून, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरविंद मच्छींद्र कुंजीर (वय ५०, रा. वळती, ता. हवेली) हे १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातील गट नं. ३२८ मध्ये मिरचीच्या रोपांना पाणी देत होते. यावेळी पूर्वी तोडलेल्या बांधावरील झाडांच्या कारणावरून वाद निर्माण झाला.

या वादातून आरोपी संभाजी एकनाथ कुंजीर (वय ४२), शैला संभाजी कुंजीर (वय ३६, दोन्ही रा. वळती, ता. हवेली) तसेच दिनेश शांताराम म्हस्के (वय ३४) व उमेश शांताराम म्हस्के (वय ३५, दोघे रा. डाळींब, ता. दौंड) यांनी संगनमत करून फिर्यादीवर कोयता, गज, स्क्रूड्रायव्हर व विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या नाकावर, छातीवर, हातावर व कंबरेवर गंभीर दुखापत झाली.

तसेच आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास उरुळी कांचन पोलिस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!