एकनाथ शिंदेंची पॉवरफुल खेळी! थेट राजकीय आघाडी फोडली, बड्या तीन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश..

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवरच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकत निवडणुकीनंतर सोलापूर, पंढरपूरमध्ये गेमचेंजर ठरणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडल्याचे समोर आलं आहे. आघाडीत फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं वर्चस्व आहे. याच आघाडीतील नगरसेवकांनी भगीरथ भालकेंपासून फारकत घेतली आहे. भगीरथ भालके, नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि अनिल सावंत यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या तिन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी खेळी मानली जात आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत गुप्त बैठक घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी ते वृत्त फेटाळले होते. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात मोठा डाव टाकत तीर्थक्षेत्र आघाडीत फूट पाडली आहे. या पक्षातील तिन्ही नेत्यांच्या पक्ष प्रवेशाआधीच तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

मंगळवेढा येथील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांचे पती आणि ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांची भालके यांच्याविषयी नाराजी आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांना अंधारात ठेवून भगीरथ भालकेंनी पक्ष प्रवेश निश्चित केल्याचा आरोप बबनराव आवताडे यांनी केला आहे. यामुळे त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
