गर्भवती महिलेची कुजलेली बॉडी सापडली, डाव्या हातावर रविराज नावाचा टॅटू अन् सहा ते सात महिन्यांची गरोदर, इंदापुरातील घटनेचं गूढ काय?


इंदापूर : तालुक्यातील मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला असून, मृत महिला अंदाजे २५ ते ३० वर्षांची असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

एका गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे. चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेला हा मृतदेह पाहून स्थानिक नागरिक थरारून गेले. या घटनेने दौंड–भिगवण परिसर हादरला असून, पोलिस आता या प्रकरणाचा गुन्हेगारी कोनातून तपास करत आहेत.

मृत महिलेच्या डाव्या हातावर रविराज नावाचा टॅटू असून या मृत महिलेची ओळख अद्याप पटली नसून तिचा खून कोणी आणि का केला याचा सखोल तपास भिगवण पोलिस करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला सहा ते सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे.

       

हा प्रकार बारामती भिगवण राज्य मार्गावरील मदनवाडी पुलाखाली उघडकीस आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही महिला अंदाजे सहा ते सात महिन्यांची गर्भवती होती. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

या दरम्यान परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. तपासात असे दिसून आले की, मृतदेहाला सुमारे पाच ते सहा दिवस झाले असावेत. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!