पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये सर्वात मोठा घोटाळा, गुंतवणूकदार कंगाल तर 23 जणावर गुन्हा दाखल, घोटाळ्याचा सूत्रधार कोण?


पुणे : पुण्यातील बाणेर-हिंजवडी आयटी पार्क परिसरात सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.टी डब्ल्यू डे नावाच्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.या प्रकरणी कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकांसह एकूण २३ जणांविरोधात वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संपूर्ण घोटाळ्याचा सूत्रधार समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी नेहा नार्वेकर असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

फसवणूक करणाऱ्या आरोपींनी सुरुवातीला ‘लर्निंग सोल्युशन्स’ नावाच्या क्लासमार्फत शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदारांना त्यांच्या नेटवर्कमध्ये सामील केले. त्यानंतर टी डब्ल्यू डे इव्हेंट्स आणि इतर काही बनावट कंपन्यांकडून आकर्षक गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले. यामध्ये, १० लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ३ टक्के मासिक परतावा, १० लाखांवर ४ टक्के, तर २५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ५ टक्के मासिक परतावा देण्याचे आश्वासन दिले गेले.सुरुवातीच्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा मिळाल्याने त्यांचा कंपनीवर विश्वास बसला. यामुळे अनेकांनी बँका आणि इतर ठिकाणांहून कर्ज काढून मोठी रक्कम गुंतवली. फिर्यादी प्रार्थना मशीलकर यांनीही कर्ज घेऊन तब्बल ३२ लाख रुपये गुंतवले होते. मार्च २०२५ पर्यंत त्यांना वेळोवेळी गुंतवणुकीचा परतावा देण्यात आला. मात्र त्यानंतर अचानक सर्वांचे पेमेंट बंद झाले. आयकर विभागाची प्रक्रिया सुरू आहे किंवा परदेशी गुंतवणूक येणार आहे, अशी कारणं देत कंपनीने वेळ मारून नेली. या प्रकरणाचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर समीर व नेहा नार्वेकर यांच्यासह एकूण २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       

पोलिसांनी या सर्व आरोपींवर बेकायदा ठेवी योजना (प्रतिबंध) अधिनियम २०१९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या घोटाळ्याची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!