धन्य तो निवडणूक आयोग आणि धन्य ती मतदार नोंदणी प्रक्रिया! शिरूरमध्ये बोगस मतदार, निवडणूक आयोगाचे मात्र अजब उत्तर..

पुणे : राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच काँग्रेस नेते राहुल गांधी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप करत आहेत. भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. यामुळे याबाबत चर्चा सुरु आहे.

याबाबत कालही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब टाकला. याबाबत ते म्हणाले, निवडणूक आयोगाने विरोधकांना, काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यावर आज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, मतदार यादीत बोगस नावं कशाप्रकारे घुसवली जातात याचं सविस्तर प्रेझेंटेशन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच केलं. राज्यात याचा नमुना बघायचा असेल तर शिरुर विधानसभा मतदारसंघातील काही संशयित मतदारांची शहानिशा करण्याची मागणी उमेदवार अशोक बापू पवार यांनी निवडणूक आयोगाकडं केली होती.

परंतु सदर मतदार दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं, मात्र त्याची नोंद कशी झाली? याबाबत हात झटकले आणि याचं खापर ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेवर फोडल. धन्य तो निवडणूक आयोग आणि धन्य ती मतदार नोंदणी प्रक्रिया! एक बरं झालं, संबंधित मतदार दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचं तरी निवडणूक आयोगाने मान्य केलं.
पण राज्यभरात असे बनावट मतदार किती असतील, याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात बोगस मतदानावरून निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागणार असून अशी अनेक उदाहरणे सध्या समोर येत असल्याने भाजपची अडचण होत आहे.