कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळणार, महादेवी हत्तीणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय..

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्वाची बैठक झाली. यामध्ये बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरात आणण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील यांसारखे राज्याचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

तसेच शेतकरी नेते राजू शेट्टी, सतेज पाटील, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने, प्रकाश आवाडे देखील सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महादेवी हत्तीण वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारचा नव्हता, तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे घेतला गेला. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आता जनभावनेचा आदर करून हत्तीण परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कोल्हापूरकरांकडून सुरू असलेल्या आंदोलन आणि भावनिक लाटेनंतर आता सरकारने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत सांगितले की, नांदणी मठाने एक याचिका दाखल करावी.

राज्य सरकारही आपली याचिका सुप्रीम कोर्टात सादर करेल. हत्तीणच्या निगा राखण्यासाठी डॉक्टरांची आणि अधिकाऱ्यांची एक विशेष टीम राज्य सरकारकडून नियुक्त केली जाईल. ३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे, ती परत यावी ही आपली सामूहिक इच्छा आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
त्यांच्या वक्तव्यामुळे कोल्हापुरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आहार, आरोग्य, रेस्क्यू सेंटर व्यवस्थापन याबाबतही राज्य सरकार सुप्रीम कोर्टासमोर ठोस आश्वासन देणार आहे. यामुळे महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरात आणण्याच्या दृष्टीने सरकारकडून सकारात्मक पुढाकार सुरू झाला आहे. यामुळे आता अनेकांचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.