शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्राकडून पीएम धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी, १.७ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ, जाणून घ्या..

नवी दिल्ली : मोदी सरकारने ‘पीएम धन-धान्य कृषी योजना’ या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने सध्या सरकार प्रयत्न करत असून याचाच एक भाग म्हणून ही योजना सुरू केली आहे. ३६ योजनांना एकत्रित करून ‘पीएम धन-धान्य कृषी योजना’ मंजुर करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ १ कोटी ७० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या योजनेतून पिक कापणीनंतरची साठवणूक क्षमता वाढवणे, सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे आणि कृषी उत्पादनक्षमता वाढवणे यावर लक्ष केंद्रीत असेल. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
ही योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील टप्प्याप्रमाणे महत्त्वाची ठरणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादनक्षमता कमी आहे, पीक पेरणी कमी होते आणि कर्जपुरवठा अपुरा असतो अशा जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. या योजनेमुळे शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि नफा मिळवणारी शेती शक्य होणार. शेतीमालाची योग्य किंमत मिळण्याची शक्यता वाढणार. स्थानिक रोजगाराच्या संधी वाढणार उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढणार आहे.
तसेच यामध्ये पीएम धन-धान्य कृषी योजना म्हणजे केवळ योजना नव्हे, तर भारतीय कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देणारी धोरणात्मक योजना आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील आहे.