चिंता वाढली!! देशभरामध्ये १ हजार ३०० कोरोना रूग्ण, महाराष्ट्रासह केरळमध्ये परिस्थिती भयंकर..

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे चिंता वाढली आहे. असे असताना आता देशाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. देशभरामध्ये तब्बल १ हजार ३०० कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

यामुळे आता काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये सध्या केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे बाधिक झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत केरळ पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरताना दिसतंय. यमुल्लेसध्या चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रशासन सतर्क झाले आहे.
देशात कोरोना पुन्हा एकदा हात-पाय पसरताना दिसत असून आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. केरळ राज्यात सर्वाधिक ४३० कोरोना रूग्णांची नोंदर आहे तर महाराष्ट्रात ३८३ कोरोना रूग्ण अद्याप सक्रिय असून सात रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे अजून रुग्णसंख्या वाढली तर मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत.

दरम्यान, देशातील काही राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोरोना तपासणी आणि उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिल्लीमध्ये 104 रुग्णसंख्या आहे. देशभरात एकूण 10 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या चार नव्या व्हेरिएंटचा शोध लागला असून त्यापैकी JN.1 या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.
यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. सध्या आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. JN.1 प्रकाराची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात. जर तुमची लक्षणे बराच काळ टिकली तर तुम्हाला दीर्घकाळ कोविड असू शकतो. यामध्ये डोकेदुखी, ताप येणे, डोळ्यात जळजळ, कोरडा खोकला, चव जाणे आणि वास न येणे, घशामध्ये खवखव, सर्दी, थकवा येणे, मांसपेशींमध्ये वेदना, उलट्या होणे, ही लक्षणे आहेत.
ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणे बरी झाल्यानंतरही कायम राहतात. दरम्यान, JN.1 प्रकाराची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. जर लक्षणे दिसून आली तर तत्काळ दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला आहे.