लग्न ठरलं, वऱ्हाड आलं, नवरी सजली पण लग्नाच्या आधीच काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुलगा बेपत्ता! धक्कादायक माहिती आली समोर..


अमरावती : येथील काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव लग्नाच्या एक दिवस आधीच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. या घटनेची अमरावती जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

वैभव मोहोड यांचं अपहरण झालं की काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. वैभव याचा बुधवारी 14 मे रोजी विवाह सोहळा आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र हा मुलगा बेपत्ता झाल्याने सगळ्यांना एकच धक्का बसला आहे. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मंगळवारी वैभव मोहोडला हळद लागणार होती. असे असताना मंगळवारी सकाळपासून तो काही कामानिमित्त घराबाहेर पडला. परंतु घरी परतला नाही. नंतर घरच्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांत दिली. काही साहित्य आणायला बाहेर जातो असे सांगून वैभव घराबाहेर पडला. मात्र घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसात तक्रार दिली आहे.

कुटुंबीयांनी त्याला संपर्क करायचा प्रयत्न केला असता त्याच्याशी संपर्क झाला नाही. उद्याच लग्न असल्यामुळे घरी पाहुणे आले, त्याला हळद लागणार असल्यामुळे घरात त्याची तयारी सुरू झाली होती. मात्र आता मुलाच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला असून याबाबत त्याचे मित्र आणि इतर लोकांकडे चौकशी केली जात आहे.

या मुलाने घरून बाहेर पडल्यानंतर सकाळी एटीएमवरून काही रक्कम काढली आहे. नंतर तो कुठे गेला आणि का गेला किंवा त्याचे कोणी अपहरण केले का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. वैभव मोहोडचा बडनेरा जुन्या बायपासवरील एका हॉटेलमध्ये विवाह सोहळा आयोजित केला आहे. याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!