अखेर वाल्मिक कराडचा खेळ संपला!! देशमुखांच्या मारेकऱ्यांनी चौकशीत सगळंच सांगितलं, थेट कबुलीच दिली, कराड अडकला…

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सध्या सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याठिकाणी त्याची चौकशी केली जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये महत्वाची माहिती समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या तसेच पवनचक्कीला दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील विष्णू चाटे पोलिस कोठडीत आहे. त्यांने दिलेल्या माहितीनंतर आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्याने मोठं वक्तव्य याबाबत केलं आहे.
याबाबत खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीमध्ये कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांची फोनवरती संभाषण केलं होतं, असा गौप्यस्फोट त्याने केला आहे. वाल्मिक कराड याचे अधिकाऱ्यांशी बोलणं झाले होते, अशी कबुली विष्णू साठे यांनी दिलेली आहे.

सीआयडी न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा त्यांनी केला आहे. विष्णू चाटेच्या फोनवरून कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार केली होती, कराडने कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केले असल्याचा देखील विष्णू साठे यांनी सांगितलं आहे. यामुळे हा एक मोठा पुरावा समोर आला आहे.
त्यामुळे आता कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कोठडीमध्ये कराडला खास सुविधा मिळत असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराडने आपल्याला गंभीर आजार असल्याचा दावा करत मदतनीस म्हणून खास व्यक्तीच्या नावाची शिफारस केली आहे.
वाल्मिक कराड याने न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्याने आपल्याला एक स्लीप ॲप्निया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी या याचिकेतून केली आहे. याबाबत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.