संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठाकरे गटाची मोठी मागणी, वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता..

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि खंडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली आहे. त्याला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

आता सरकारने आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापण केली आहे. या एसआयटीमधील सर्व अधिकारी बीड जिल्ह्यातीलच आहे.
त्यामुळे बीड जिल्ह्यातच या घटनेचा तपास होणार आहे. मात्र या तपासावर आता विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच हा तपास आता बीड जिल्ह्याबाहेर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटीने केली आहे.

बीडमध्ये कायद्याचे राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन,तोच निर्णय व्हायचा. बीडने अनेक खून पाहिले, अनेक खून पचाविले पण संतोष देशमुखच्या खुणा नंतर जी वाचा फुटली त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे.
सरकारला देखील हालचाल करावी लागली सरकारला असे खून वाचवायचे सवय आहे,असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला लगावला आहे.
तसेच सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या त्यांचा वावर पाहता या प्रकरणात खरोखर न्याय मिळेल का अशी शंका आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.तसेच फडणवीस म्हणतात की कोणालाही सोडणार नाही पण फडणवीस आणि कुणाला कधी सोडले आणि कसं अडकवले याची एक एसआयटी नेमली पाहिजे.
दरम्यान, गेल्या काही काळामध्ये फडणवीस यांनी किती जणांना सोडलं आहे .रक्ताचे डाग धून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे आणि त्यांच्या आक्रोश किंकाळ्या दाबल्या आहेत. किती जणांना अडकविला आहे याची एसआयटी त्यांनी स्वतः स्थापन केली आणि स्वतः त्यांचे रिपोट घ्यायला पाहिजे, असा चिमटा राऊतांनी फडणवीसांना काढला आहे.