अष्टापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांनी भरवला आठवडे बाजार, मेळाव्यातून ६० हजारांची उलाढाल…


उरुळीकांचन : बाल वयात अर्थिक व व्यावहारीक ज्ञान मिळावे तसेच व्यवसायात सहभाग वाढावा या उद्देशाने अष्टापूर ( ता.हवेली ) येथील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने कौतुकास्पद उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी आठवडे बाजार हा उपक्रम तयार करुन आठवडे बाजाराची उलाढाल गावात करीत विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञानासाठी प्रोत्साहीत करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा अष्टापूर यांच्या वतीने गावात बाल आनंद मेळावा (आठवडा बाजार) हा उपक्रम शनिवार (दि.२८) राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार भरवून आपल्या मालाची विक्री बाजारात करुन व्यवहाराचे धडे गिरविले आहे.

या कार्यकमाचे उदघाटन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांच्या हस्ते होऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अष्टापूर केंद्राचे केंद्रप्रमुख शेषराव राठोड यांची उपस्थिती होती.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ, भाजीपाला, फळे, नर्सरी, छोटे छोटे खेळ यांचे स्टॉल लावले लावून त्यांची विक्री केली. या विक्रीतून तब्बल ६० हजार रुपये अर्थिक व्यवहार करण्यात आला.

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले , विद्यार्थ्यांना बाल वयात व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून आयोजित उपक्रम कौस्तुकास्पद आहे. बाल वयात अर्थिक जबाबदारीची गोडी लागल्यास भवितव्य घडविणारी पिढी तयार होणे शिक्षकांचे कर्तव्य आहे. प्रत्येक शाळांनी असे कौतुकास्पद उपक्रम राबवावे असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!