Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात आजपासून येणार पैसे, १५०० की २१०० किती रुपये मिळणार?, जाणून घ्या…

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यांच्या अंतिम महिन्याच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहे.
राज्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला मिळाला. महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. महायुतीचे २३० जागांवर उमेदवार निवडून आले. भाजपला प्रथमच १३२ जागा मिळाल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ जागांवर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला. Ladki Bahin Yojana

महायुतीने लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीत केली होती. त्यानुसार आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून वाढीव २१०० रुपये मिळणार की १५०० रुपयेच देण्यात येणार त्याचे स्पष्टीकरण झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानुसार २१०० रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता १५०० रुपयांप्रमाणे मिळणार आहे.
तसेच २१०० रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. २१०० रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.