Sharad Pawar : संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी शरद पवार यांची थेट गावात जाऊन मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले शरद पवार?


Sharad Pawar : काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बीडच्या मस्साजोग येथे येऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधून प्रकरण समजून घेतले आहे.

यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केले आहे. मुलीला बारामतीच्या वसतिगृहात पाठवा, मी कॉलेजपर्यंतचं सर्व शिक्षण करतो, असे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही आम्ही घेतो, असेही सांगितले आहे.

शरद पवार हे आज बीडच्या मस्साजोग गावात आले होते. त्यांच्यासोबत खासदार निलेश लंके, बजरंग सोनावणे आणि माजी मंत्री राजेश टोपे होते. यावेळी शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची विचारपूस केली. ही घटना कशी घडली? नेमकं काय घडलं होतं? याची माहिती घेतली. Sharad Pawar

यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या कर्मवीर वसतिगृहात शिक्षणासाठी यायला सांगितलं. तिथे ९ हजार मुली शिकत आहेत. तूही ये. तुझा कॉलेजपर्यंतचा शिक्षणाचा खर्च मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका, असं शरद पवार म्हणाले. तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही आम्ही घेऊ, असंही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, यावेळी कुटुंबातील आणि गावातील लोकांनी शरद पवार यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला. संतोष देशमुख यांनी या गावाला १९ पुरस्कार मिळवून दिले होते. एवढ्या मोठ्या माणसाला मारून टाकले. आमचे काय साहेब? आम्ही घाबरलोय, असे गावकरी म्हणाले. सरपंचाला मारणारे आरोपी आमच्या गावातील नाही. आमच्या गावातील लोग गुण्यागोविंदाने नांदतात. आमच्यात भांडण होत नाही. निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र असतो, असे गावकरी म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!