Devendra Fadnavis : माजोरड्यांचा माज उतरवीणार!! कल्याणमधील राड्यांतर अखिलेश शुक्लांचे निलंबन, मुख्यमंत्र्यांची घोषणा…

Devendra Fadnavis : कल्याण येथील मराठमोळ्या कुटुंबाला मारहाण केल्याच्या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाईची घोषणा केली आहे.

यावर विधान परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्ला याचे निलंबन करण्यात येणार असल्याचे सांगितले. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार काढले, भांडण काढले, मारामारी केली.
त्यातून एक संपाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे. अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी असून त्याच्या विरोधात एफआयआर नोंद करण्यात आली आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. Devendra Fadnavis

या प्रकरणात पुढील कारवाई पोलिस करत आहेत, कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचे कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहिल असे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आहे.
ते पुढे म्हणाले की, कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही, मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील. कधीकधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात. माज आणल्यासारखं करतात. अशा माजुरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले आहे.