Sanjay Raut : मोठी बातमी! खासदार संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, गाडीवर आले, हातात १० मोबाईल आणि…


Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. . शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, दोन जण संजय राऊत यांच्या घराबाहेर आले. त्यांच्या हातात आठ ते दहा मोबाईल होते. Sanjay Raut

वाहनचालकाच्या हातात मोबाईल होता. तर मागे बसलेल्या व्यक्तीकडे चौरशी पुठ्ठ्यावर अनेक मोबाईल असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकरणावर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, घटनास्थळी झोन सात मधील पोलीस विभागाची विविध पथके दाखल झाली आहेत.

सीसीटीव्ही आणि आजूबाजूला कसून चौकशी करण्यात येत आहे. जी बाईक होती ती यूपी, बिहारची असावी, बाबा सिद्धीकी प्रकरण घडल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचे आमदार सुनील राऊत यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!