Maharashtra Politics : एक मंत्रिपद राखीव ठेवलंय, जयंत पाटील महायुतीत येणार आहेत!!! दादांच्या विश्वासू नेत्याने सगळंच सांगून टाकलं…

Maharashtra Politics : मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर दोन आठवडे होत आले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यानं महायुतीत खातेवाटपावरून नाराजी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, अखेरीस नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला.

रविवारी महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आता मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांची बेरीज केली तर हा आकडा ४२ इतका होतो. Maharashtra Politics
कायद्यानुसार महाराष्ट्रात ४३ मंत्रीपदांची तरतूद आहे. असं असूनही एक मंत्रीपद रिक्त ठेवल्याने आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

महायुतीतलं एक राखीव मंत्रीपद शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आले आहे. ते लवकरच महायुतीत सहभागी होतील, असं थेट वक्तव्य मिटकरी यांनी केलं. राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढवले जात आहे.