हवेलीत दिड दशकांच्या कालखंडानंतर यशवंत कारखान्याचा जमिन विक्रीचा प्रश्न निकाली! पुणे बाजार समितीकडून कारखान्याच्या ४९.१८ एकर क्षेत्राचे पहिले खरेदी खत पूर्ण…

जयदिप जाधव

उरुळीकांचन: सन २०१० – ११च्या गळीत हंगामात आर्थिक भागभांडवल अभावी बंद पडलेल्या थेऊर (ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमिनीची अखेर पुणे (हवेली ) बाजार समितीने अखेर केली आहे. कारखान्याने राज्य सरकारच्या परवानगीने विक्रीसाठी ९९.२७ एकर जमिनीपैकी ४९.१८ जमिनीच्या पहिल्या टप्प्यातील जमिन खरेदीचे पहिले खरेदीखत पुणे बाजार समितीच्या समितीने बुधवार (दि.१७ ) रोजी पूर्ण केले आहे.
या खरेदीखताने कारखान्याला १४८ कोटी रुपये रुपये भांडवल उभे करण्याचा मार्ग मोकळा झाला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांनी सर्व प्रशासकीय पातळीवरील स्थगिती व राज्य पणन विभागाच्या जमीन खरेदीच्या परवानगी पूर्ण होण्याचे सोपस्कार झाल्यानंतर कारखाना सुरू होण्याचा मार्ग १५ वर्षानंतर प्रदिर्घ कालखंडानंतर प्रशस्त झाला आहे.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या या अंतर्गत प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती. या निर्णयानुसार पुणे बाजार समितीला कारखान्याची ९९.२७ एकर जमिन खरेदीची मान्यता दिली होती. त्यानुसार स्थानिक जमिनीचे शासकीय मूल्यांकन होऊन चालू बाजारभावानुसार जमिन खरेदीला राज्य शासनाने मंजुरी दिली होती.

त्यानुसार पुणे बाजार समितीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ कलम १२(१) नुसार परवानगी माघितली होती. मात्र परवानगीला पणन विभागाने स्थगिती दिली होती. त्यानंतर स्व. अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खा. पार्थ पवार यांनी पुणे बाजार समिती व यशवंत कारखाना या संस्थांतील ठरावास बळ दिल्याने राज्य शासनाच्या सर्व मंजुऱ्यांनी बुधवार (दि.१७) पुणे बाजार समिती तर्फे नेमणूक केलेल्या संचालक मंडळातील सभापती प्रकाश जगताप, संचालक नानासाहेब आबनावे व गणेश घुले यांच्या करवी ४९.१८ एकर जमिनीचे पहिले खरेदी खत पूर्ण केले आहे.
कारखान्यातर्फे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे व कार्यकारी संचालक कौलास जरे यांच्या करवी विक्रीला मान्यता दिली आहे. त्यानुसार कारखान्याने गटक्र ३६, गटक्र.२, गट क्र.३७, गट क्र.४१/१ अशा जमिनीचे क्षेत्र पुणे बाजार समितीला विक्री केले आहे.
या व्यवहाराने कारखान्याचा गेली १५ वर्षांत १२ वेळा असफल झालेला जमिन विक्रीचा प्रयत्न पूर्ण झाला आहे. या जमिन विक्रीसाठी यापूर्वी प्रशासकीय पातळीवर अनेक प्रयत्न झाले होते. मात्र या विक्रीला प्रशासकीय पातळीवर ‘राजकीय हस्तक्षेप’ अनेक वेळा कारणीभूत ठरल्याने यश मिळत नव्हते. अखेर स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर पुणे बाजार समिती व यशवंत कारखाना संचालक मंडळातील जमिन विक्रीचा प्रस्तावाला गती मिळवून त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खा. पार्थ पवार यांनी स्व. अजित पवार यांनी तालुक्यासाठी घेतलेली भूमिका मान्य करुन या व्यवहाराला अंतिम रुप मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान या व्यवहाराने तालुक्यातील सहकाराशी निगडीत १५ वर्षापासून भिजत पडलेला प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पहिल्या टप्प्यातील जमिन विक्रीने कारखाना संचालक मंडळाच्या हातात १४८ कोटींचे भांडवल उभे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘पुणे बाजार समितीचा विस्तार व मार्केटयार्ड बाजार तसेच मांजरी उपबाजार या समितीच्या आवारासाठी जागेची कमतरता आहे. पुणे बाजार समितीने या जागेचा प्रश्न व बाजार समितीच्या शिल्लक ठेवींतून ती जागा खरेदीकरण्यासाठी पसंती दिली होती. या व्यवहाराने बाजार समितीचा जागेचा प्रश्न व कारखान्याला भाग भांडवल उभारणीचा प्रश्न सुटेल अशी जोड देऊन खऱ्या अर्थाने स्व. अजित पवार यांनी या ठरावा साथ दिली. त्यांच्या कारखाना सुरू करण्यांच्या स्वप्नाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खा.पार्थ पवार यांनी पाठिंबा देऊन सर्व प्रशासकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पारदर्शकपणे खरेदीचा व्यवहार
पूर्ण केला आहे.”– प्रकाश जगताप सभापती, पुणे बाजार समिती
“यशवंत कारखाना सुरू करणे हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एक स्वप्न आहे. परंतु अर्थिक भांडवलीचा मुद्दा व भांडवल उभे करण्यासाठीचे सर्व प्रयत्न असफल झाल्याने सभासदांची मान्यता घेऊन हे पाऊल उचलले आहे. बाजार समिती व कारखाना या दोन्ही संस्थांनी पारदर्शकपणे प्रचलित चालू बाजार भावात जमिन खरेदीचा व्यवहार केला आहे. विक्रीतून उभ्या झालेल्या भांडवालातून पारदर्शकपणे कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न होईल”
-सुभाष जगतापअध्यक्ष-यशवंत सहकारी साखर कारखाना.