Maharashtra Election 2024 : शिरुर -हवेलीच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीश्वर सोडविणार! भाजप की राष्ट्रवादी आज होणार फौसला…!!


जयदिप जाधव

Maharashtra Election 2024 उरुळीकांचन : शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा गुरुवार( ता. २४) रोजी आज दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता आहे. भाजपकडून पारंपारीक मतदारसंघासाठी दावा केल्याने शिरुर -हवेलीच्या जागावाटपावरुन तिढा निर्माण झाला असून अंतिम फैसला दिल्ली दरबारी होणार आहे.

त्यामुळे हाभाजपकडे राहणार की राष्ट्रवादी जाणार म्हणून मतदारसंघाच्या सर्व नजरा दिल्लीश्वरांच्या निर्णयाकडे राहणार आहे. महायुतीच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यातील शिरुरचा अपवाद वगळता इतर जागांची जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. अपवाद फक्त शिरुर असल्याने राज्यपातळीवर हा तिढा न सुटल्याने भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपातळीवर राष्ट्रवादीशी तिढा न सुटलेल्या पाच जागांचा विवाद दिल्लीदरबारी नेऊन ठेवला आहे. या पाच जागांत बार्गेनिंग पावर (ताकदीच्या ) जोरावर भाजपने आपल्याकडे माघितल्या आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील जागा असल्याने या जागेची मागणी तीव्र स्वरुपात जागावाटपात केली आहे. Maharashtra Election 2024

तसेच त्यांनी या जागेवर भाजपकडून इच्छुक असलेल्या प्रदिप कंद व उबाठाकडून आयात करुन घेतलेल्या माऊली कटके यांच्यात समेट घडवून आणून जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. या जागेसाठी त्यांनी शिरुर व हवेली तालुक्यातील स्थानिक नेत्यांशी बोलणी करीत आहे. परंतू देवेंद्र फडणवीस हे प्रदिप कंदांसाठी जागा सोडवून घेण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत असल्याने शिरुरचा तिढा दिल्रीदरबारी पोहचला आहे.

आज दिल्लीत महायुतीच्या जागावाटपात अंतिम तोडगा निघणार असून महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.भाजपकडून राष्ट्रवादीसाठी काही जागासोडण्यासाठी प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी विधानपरिषदेच्या काही जागा राष्ट्रवादी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने जिल्ह्यात दौंड नंतर शिरुरची जागा आपल्याकडे ठेवून अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे जागावाटपात शिरुरच्या जागेचा तिढा आज निकालात निघणे अपेक्षित आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!