दहीहंडीमधील डान्स आला अंगलट, आता राधा पाटील चांगलीच अडचणीत, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात अनेक वाद विवाद होत आहेत. तसेच डीजेच्या आवाजामुळे देखील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. अअसे असताना लावणी सादर करताना अश्लील नृत्य होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दहीहंडी मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकाविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कलाकारांकडून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याने पोलिसांनी कार्यक्रमास परवानगी नाकारली होती. त्यानंतरही कार्यक्रम घेण्यात आला आहे.

कार्यक्रमादरम्यान अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्य सादर होऊ नये, यासाठी प्रशासनाने संबंधित आयोजकांना काही अटी घातल्या होत्या. त्यामध्ये कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे ही महत्त्वाची अट होती. या प्रकरणी राधा पाटील, अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्राधिकृत कागदपत्रे किंवा आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कार्यक्रमासाठी परवानगी नसतानाही तो आयोजित करून त्यात लावणीचे सादरीकरण करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, कार्यक्रमांचे आयोजन करताना प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील किंवा आक्षेपार्ह नृत्यप्रकार सादर होऊ नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक परवानग्या आणि प्रमाणपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्याकडे अनेकांनी लक्ष दिले नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!