पुणेकरांनो, पाण्याचा साठा करून ठेवा! ‘या’ दिवशी अनेक भागांचा पुरवठा राहणार बंद, पाहा यादी


पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे 10 सप्टेंबर रोजी पुण्यातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 11 सप्टेंबरला सकाळच्या सत्रात काही भागांत उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड जॅकवेल, वारजे जलशुद्धीकरण केंद्र यासह विविध ठिकाणी विद्युत व्यवस्था, पंपिंग यंत्रणा आणि इतर तांत्रिक देखभालीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

पर्वती एचएलआर टाकीशी संबंधित कामामुळे सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, शिवतेजनगर, अप्पर व लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, गंगाधाम, चिंतामणीनगर, लेक टाऊन, प्रेमनगर, सॅलेसबरी पार्क, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कोंढवा खुर्द, साईबाबानगर आणि जनता वसाहत या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

एसएनडीटी जलकेंद्राच्या कामाचा परिणाम गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बाणेर रोडचा काही भाग, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता आणि वारजेच्या काही भागांवर होणार आहे.

भामा आसखेड जलकेंद्राच्या देखभाल कामामुळे कळस-धानोरी, लोहगाव, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी तसेच आळंदी नगर परिषद आणि आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकीअंतर्गत बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म आणि मेडिपॉईंट रस्ता या भागांना पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार आहे.

वारजे जलकेंद्रालगतच्या जीएसआर टाकीच्या कामामुळे कर्वेनगर, शाहू कॉलनी, इंगळेनगर, वारजे जकात नाका आणि आसपासच्या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच चांदणी चौक टाकीच्या कामामुळे पाषाण, बावधन, भुसारी कॉलनी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रोड, भूगाव रोड परिसर, गांधी भवन, वारजे माळवाडी, काकडे सिटी आणि कोथरूड परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी 10 सप्टेंबरपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा. 11 सप्टेंबरला पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कमी दाबाने किंवा उशिराने पाणी मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!