Sharad Pawar : शरद पवारांनी डाव टाकला, युगेंद्र पवार बारामतीमधून, ५० जणांना AB फॉर्मचे वाटप..

Sharad Pawar : महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पण शरद पवार यांनी आपला डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत ५० जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत ५० जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये युगेंद्र पवार यांच्या नावाचा समावेश असल्याचे समोर येत आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार असल्याचे आता दिसत आहे.


लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात आघाडीवर असणाऱ्या युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी बारामतीमधून उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यानंतर युगेंद्र पवार तयारीला लागले आहेत.
युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मालमत्तेवर थकबाकी नसल्याबाबतचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतण्या उभा राहणार हे आता निश्चीत आहे. Sharad Pawar
राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकाच दिवसात सुमारे ५० एबी फॅार्मचे वाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या पक्षासोबत असलेल्या सर्व आमदारांना देखील एबी फॅार्म दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व ५० जणांचा पहिल्या यादीत समावेश आहे.
मराठवाडा आणि विदर्भ अशा दूरच्या उमेदवारांना पक्षाकडून एबी फॅार्मच वाटप झाले आहे. बारामतीचे युगेंद्र पवार आणि मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभेच्या उमेदवार राखी जाधव यांनाही एबी फॅार्म देण्यात आला आहे. AB फॅार्म दिल्यानंतर कामाला लागण्याच्या सूचना पक्षाच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.
कुणाला देण्यात आले एबी फॉर्म?
जयंत पाटील
प्राजक्त तनपुरे
सुनील भुसारा
रोहित पवार
युगेंद्र पवार
राखी जाधव
जितेंद्र आव्हाड
अनिल देशमुख
प्रशांत यादव
राणी लंके
राहुल जगताप
