Railway Accident : नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले..

Railway Accident : राज्यात एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. लाखो चाकरमान्यांना गावाचे वेध लागले आहे. अशातच नागपूरमध्ये रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रकवरून खाली उतरले आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहिती नुसार, शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रकवरून खाली उतरले आहे. कुर्ला- शालिमारकडे एक्स्प्रेस नागपुरातून जात असताना कळमना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे पटरीच्या खाली उतरले.

यात एस टू आणि पार्सलचा एक डबा आहे. एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासन काम सुरू आहे. Railway Accident


दरम्यान, घटनेच्या वेळी रेल्वेचा वेग कमी असल्यानं दुर्घटनेची तीव्रता कमी होती. रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनानं काम सुरू केले आहे. या दुर्घटनेमुळं हावडा मुंबई या मार्गावरील काही गाड्या प्रभावीत होण्याची शक्यता आहे.
काही गाड्यांच्या मार्गात बदल केले जाऊ शकतात. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वे मार्ग पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.