Uruli Kanchan : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सूचनेकडे उरुळीकांचन प्रवाश्यांचे डोळे! ट्रान्सपोर्टेशनसाठी स्थानकाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष…!!


जयदिप जाधव

Uruli Kanchan :  केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी पुणे रेल्वे स्थानकाला मागील आठवड्यात भेट देताना पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यासह पुणे रेल्वे स्थानकाला सुविधांसह दळणवळणासाठी प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे रेल्वे स्थानकासह स्थानकाजवळील उरुळीकांचन रेल्वे स्थानकाचा वापर रेल्वेच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी करणार असल्याचे संकेत रेल्वेमत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात उरुळीकांचन रेल्वेस्थानकाचा रेल्वे ट्रान्सपोर्टेशनसाठी वापर होणार असल्याने या स्थानकावरुन रेल्वे गाड्या सुटणार का ? म्हणून प्रवाश्यांचे लक्ष रेल्वे प्रशासनाकडे लागले आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रान्सपोर्टेशनसाठी मर्यादा असल्याने भविष्यात पुणे शहरालगतच्या रेल्वे स्थानकांवर रेल्वेचे ट्रान्सपोर्टेशन करावे लागणार आहे. रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी पुणे शहरातील स्थानकावरील मर्यादा पहता उपनगराजवळ रेल्वे ट्रान्सपोर्टेशनसाठी स्थानकांचा पर्याय शोधण्याची गरज पाहून पुणे स्थानकावरील ट्रान्सपोर्टेशन अन्य स्थानकांवर करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या स्थानकाचा विस्तार होऊन या ठिकाणावरून चांगली सेवा मिळावी अशी या ठिकाणची यापूर्वीची मागणी आहे.

उरुळीकांचन रेल्वे स्थानकावरून पुणे शहरासहीत देशपातळीवर दैनंदिन दहा हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. या ठिकाणी लांबपल्याचा महत्वाचा रेल्वे गाड्यांना रेल्वे थांबा असल्याने स्थानकाला महत्त्व आहे. पुणे शहराजवळ ट्रान्सपोर्टेशन साठी या स्थानकाचा विचार झाल्यास निश्चित चांगली सेवा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या स्थानकावरील दौंड पर्यंत उपनगररीय सेवा उपलब्ध करुन देण्याची प्रवाश्यांची मागणी आहे. दैंंनंदिन कामगार वर्ग या स्थानकावरून प्रवास करीत असल्याने उपनगरीय सेवा उपलब्ध करुन दिल्यास दळणवळणाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या घोषणेमुळे रेल्वे प्रवाश्यांचे लक्ष पुढील निर्णयाकडे लागणार आहे. Uruli Kanchan

लोकप्रतिनिधींची लक्ष पुरविण्याची आवश्यकता…

पुणे ते दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. परंतु रेल्वे मार्गांवर लोकल रेल्वेचा फेऱ्या वाढण्याची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. या मार्गावरील कमी फेऱ्या असून देखील वेळापत्रक कामगार वर्गाला अपेक्षित नाही. त्यामुळे या ठिकाणी सलग रेल्वे गाड्यांची सुविधा मिळणे आवश्यक आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दौंडला उपनगरीय सेवा देण्याची मागणी केली आहे. परंतु उरुळीकांचनचा विचार करता ही सेवा मिळू शकते परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधींना या मुद्याचा विसर पडल्याने ही सेवा मिळण्याची अनेक वर्षांची प्रतिक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!