Eknath Shinde : भुशी डॅम दुर्घटनेची एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, पर्यटन स्थळांबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या..


Eknath Shinde : पावसाळा सुरु होताच पुणे आणि परिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहेत. अनेक पर्यटक पर्यटनासाठी डोंगर, दऱ्या अन् धबधबे असणाऱ्या ठिकाणी जातात. या ठिकाणी धाडस करणे कधी चांगलेच महागात पडते.

भुशी डॅम्पच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली. धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरु आहे.

दरम्यान आता या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार आता सर्व जिल्हाधिकारी जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढवा घेणार आहेत. पावसाळी पर्यटन सुरक्षित होणे गरजेचे आहे, त्यामुळे सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जीवन रक्षक तैनात करा, कार्डिक रुग्णवाहिका ठेवा, एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी ठेवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या आहेत. मुंबईतील समुद्र किनारे सुरक्षित करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रशासन अलर्ट मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान पर्यटनाचा आनंद घ्या पण आपल्या प्रियजनांचा अनमोल जीव धोक्यात घालू नका, धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!