Air Pollution : वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर! वर्षभरात २१ लाख लोकांनी गमावला जीव, जाणून घ्या….

Air Pollution : भारतात २०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे तब्बल २१ लाख जणांचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे, यामध्ये पाच वर्षांखालील दीड लाखांहून अधिक बालकांचा समावेश होता. २०२१ साली वायुप्रदूषणामुळे पाच वर्षे वयाखालील मुले मोठ्या संख्येने मरण पावली. हा आकडा भारतात १,६९,४००, पाकमध्ये ६८,१०० होता.

दक्षिण आशियामध्ये वायूप्रदूषणामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. २०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाले. वायू प्रदूषणाचा सर्वाधिक फटका गंगा नदी किना-यावर राहणा-या लोकांना बसत आहे.
प्रदूषणामुळे गंगा किनारी राहणा-या लोकांचे आयुर्मान सात वर्षांनी घटले आहे. प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे लोकांच्या फुफ्फुसे आणि हृदयावरच परिणाम होतो असे नाही तर मेंदूवर देखील परिणाम होतो.

सध्या देशातील ९० टक्के लोक दूषित हवेतून श्वास घेत आहेत त्यामुळे मज्जारज्जूशी संबंधित आजार होत आहेत. वाढत्या प्रदूषणाने हृदयरोग, कर्करोग व फुफ्फुसांचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम गर्भवती महिला, नवजात बालके व विद्यार्थ्यांवर देखील होऊ लागला आहे. Air Pollution
वाढत्या प्रदूषणाला वेळीच आळा घातला नाही तर ही समस्या आणखी गंभीर होईल. तसे होऊ द्यायचे नसेल तर प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने आताच ठोस पावले उचलून नियोजन करायला हवे त्यासाठी पर्यावरण तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी.
प्रदुषण कमी करणे गरजेचे…
हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अध्यक्ष एलेना क्राफ्ट यांनी सांगितले की, अहवालाच्या निष्कर्षांमुळे जनजागृती होईल व प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल. वायुप्रदूषणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. ते प्रमाण कमी होण्यासाठी देशांनी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे, असेही क्राफ्ट यांनी सांगितले.