विवाहीत पुरुषाने लग्नाचे अमिष दाखवून केला बलात्कार ! पुण्यात कुठं घडला हा प्रकार ..!!


 

पुणे : पहिले लग्न झाल्याचे तरुणीपासून लपवून ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखवून   तिच्यासोबत शारीरिक संबंध  प्रस्थापित केले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याबाबत 28 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.3) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गौरव उर्फ सनी चंद्रकांत पासलकर  (रा. राजे चौक, आंबेगाव पठार) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचे लग्न झालेले असताना पिडीत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न झाल्याचे तिच्यापासून लपवून ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. पिडीत मुलगी घरात एकटी असताना घरी येऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पिडीत मुलीला आरोपीचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर तिने याबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपीने तिला मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच तुला काय करायचे ते कर मी बघुन घेईन असे म्हणून धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!