Kolhapur News : कोल्हापूरमध्ये भीषण अपघात, सहा जणांना कारने उडवलं, तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी..


Kolhapur News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातून एक भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. एका कारने चार दुचाकींना उडवल्याची घटना घडली आहे.

या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांमध्ये कारचालक वसंत चव्हाण (वय.७४, रा. वैभव हौसिग सोसायटी), हर्षद पाटील यांचा समावेश असून एकाचे नाव समजू शकलेले नाही.

धनाजी कोळी, शुभांगी कोळी, समर्थ (वय. १ वर्ष), मयुर खोत अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात ही घटना घडली आहे. चौकामधून रास्ता ओलांडत असताना भरधाव कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील काही जण चेंडूसारखे दूरवर फेकले गेले. Kolhapur News

कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये चारही दुचाकींसह कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान, या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!